ठाण्याच्या गल्लीच्या बाहेर त्यांना कोणी विचारत होतं का ?': अरविंद सावंत

ठाण्याच्या गल्लीच्या बाहेर त्यांना कोणी विचारत होतं का ?’: अरविंद सावंत

| Updated on: Jan 09, 2023 | 3:33 PM

मुंबई महापालिका निवडणुकीची रणधूमाळी सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यावरून जो तो पक्ष आपली ताकद मुंबईत दाखवत आहेय तर नुकताच उदयास आलेल्या शिंदे गटाने देखिल पक्ष म्हणून मेहनत घेण्याचे धोरण स्पष्ट केले आहे.

यवतमाळ: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने मुंबईत पाय भक्कम करण्यास सुरूवात केली आहे. त्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांना काय करायचं आहे ते करू द्या, शिवसैनिक आमच्यासोबतच आहे, असा दावा अरविंद सावंत यांनी केला.

मुंबई महापालिका निवडणुकीची रणधूमाळी सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यावरून जो तो पक्ष आपली ताकद मुंबईत दाखवत आहेय तर नुकताच उदयास आलेल्या शिंदे गटाने देखिल पक्ष म्हणून मेहनत घेण्याचे धोरण स्पष्ट केले आहे. त्यानुसार मुंबईत ताकद वाढवण्याचे काम शिंदे गटाकडून सुरू आहे.

शिंदे गटाच्या महापालिकेच्या तयारीवरून अरविंद सावंत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्याच्या गल्लीच्या बाहेर कोणी ओळखत होते का? त्यांना कधी कुणी मुंबईतील एखाद्या कार्यक्रमाला तरी बोलावल्याचं आठवतं का? ते कधी प्रभावी नेते होते का? असा सवालच त्यांनी केला. त्यांना काय करायचं ते करू द्या. शिवसैनिक आमच्यासोबतच आहे, असा दावा अरविंद सावंत यांनी केला.

Published on: Jan 09, 2023 03:33 PM