Brij Bhushan Singh on Raj Thackeray | राज ठाकरेंनी माफी मागितली तर आम्ही माफ करू - बृजभूषण सिंह

Brij Bhushan Singh on Raj Thackeray | राज ठाकरेंनी माफी मागितली तर आम्ही माफ करू – बृजभूषण सिंह

| Updated on: May 26, 2022 | 7:26 PM

उत्तर भारतीयां महाराष्ट्रात झालेली मारहानी बद्दल आधी माफी मागा त्यानंतरच तुम्हाला आम्ही माफ करू असे खासदार बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.

मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून एक नाव चांगलच गाजतंय. ते म्हणजे भाजप खासदार बृजभूषण (BJP MP Brijbhushan) सिंह यांचं, बृजभूषण खासदार जरी उत्तर प्रदेशातील असले तरी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या (Raj Thackeray)घोषित झालेल्या आणि पुन्हा रद्द झालेल्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यामुळे ते चांगलेच चर्चेत राहिले. राज ठाकरेंनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागवी मगच अयोध्येत यावं. अन्यथा राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही. या भूमिकेवर ते शवटपर्यंत ठाम राहिले. त्यामुळेच राज ठाकरेंना हा अयोध्या दौरा रद्द करावा लागला. त्यानंतरही खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात आवाज उठवण्याचे सुरूच ठेवले आहे. यावेळीही बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना निशाना करताना, राज ठाकरेंनी माफी मागितली तर आम्ही माफ करू असे म्हटले आहे.

Published on: May 26, 2022 07:26 PM