Dhananjay Mahadik: मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात खासदार धनंजय महाडिकांनी घेतले दर्शन
नवीन जबाबदारीची नव्या उत्साहाने सुरुवात करण्यापूर्वी आज मुंबई येथे सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.ही नवीन जबाबदारी कार्यतत्परतेने निभावण्यासाठी बळ देण्याची प्रार्थना सिद्धिविनायकाचरणी केली.
मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत विजयी झालेले भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक(Dhananjay Mahadik) यांनी आज मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेतले. नव्या जबाबदारीला सुरुवात करण्यापूर्वी सिद्धीविनायकाचे आशीर्वाद घेण्यासाठी ते आले होते. त्यांनी आपल्या ट्विटरवर (Twitter)ट्विट करत ही माहिती दिली होती. नवीन जबाबदारीची नव्या उत्साहाने सुरुवात करण्यापूर्वी आज मुंबई येथे सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.ही नवीन जबाबदारी कार्यतत्परतेने निभावण्यासाठी बळ देण्याची प्रार्थना सिद्धिविनायकाचरणी केली. यावेळी मंदिर ट्रस्टकडून मला सिद्धिविनायकाची प्रतिमा भेट देण्यात आली. खूप आभार! असे त्यांनी म्हटले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या या लढाईत धनंजय महाडिक यांनी शिवसनेच्या संजय पवार(Sanjay Pawar) यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये महाडिक यांची जंगी मिरवणूकही काढण्यात आली होती.