राज्यात सत्तेत असताना पंतप्रधान यांच्याकडे कसली मागणी करता? कबरीवरून जलील यांचा टोला

राज्यात सत्तेत असताना पंतप्रधान यांच्याकडे कसली मागणी करता? कबरीवरून जलील यांचा टोला

| Updated on: Mar 06, 2023 | 3:47 PM

उपोषणस्थळी बिर्याणी संदर्भात विचारले असता, त्यांनी आम्ही असं चांगलं जेवण दररोज करणार असल्याचे म्हणत आम्ही थोडंच भूख हड़ताल करतोय का? हे साखळी आंदोलन असल्याचे जलील यांनी म्हटलं आहे

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आल्यानंतर एमआयएमने विरोध केला आहे. एमआयएमच्या वतीने या विरोधात साखळी उपोषण केले जात आहे. त्याच्यावर भाजप आणि शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखिल टीका केली. त्यावर आता खासदार इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जलील यांनी, कोणाला काय बोलायचे ते बोलू द्या, कोणाला काय टीका टीपणी करायचे ते करू द्या. माझे आंदोलन सुरू आहे. जे माझ्या खांद्यावर चढून मोठे होणार आहेत त्यांना शुभेच्छा आहेत, असं जलील यांनी म्हटलं आहे. उपोषणस्थळी बिर्याणी संदर्भात विचारले असता, त्यांनी आम्ही असं चांगलं जेवण दररोज करणार असल्याचे म्हणत आम्ही थोडंच भूख हड़ताल करतोय का? हे साखळी आंदोलन आहे. तर राज्यात सत्तेत असताना पंतप्रधान यांच्याकडे औरंगजेबची कबर हैदराबादला हलविण्याची मागणी करताना असा टोलाही शिंदे गटाच्या आमदारांना लगावला आहे.

Published on: Mar 06, 2023 03:47 PM