राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंपेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न सुरूये; कुणाचा घणाघात?

राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंपेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न सुरूये; कुणाचा घणाघात?

| Updated on: Mar 23, 2023 | 12:56 PM

Raj Thackeray Uddhav Thackeray : राज ठाकरे, भाजप आणि शिवसेना या सगळ्यांची मिलीभगत आहे. म्हणून वेगात निर्णय होत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. कुणी डागलं टीकास्त्र? पाहा...

नवी दिल्ली : “राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरे, भाजप आणि शिवसेना या सगळ्यांची मिलीभगत आहे”, असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. माहीममधील बांधकाम अनधिकृत असेल तर कारवाई व्हायलाच हवी. कुठल्याही जाती धर्मातील धार्मिक स्थळ अनधिकृत असतील तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण यात धार्मिक बाब आणू नये. राज ठाकरे आणि सरकारच्या प्लॅननुसार माहिममध्ये कारवाई झाली आहे, असा आरोप इम्जियाज जलील यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. श्रीरामांनं त्यांना आशीर्वाद द्यावा की महाराष्ट्रात जातीय रंग पसरू नये, असंही जलील म्हणालेत.

Published on: Mar 23, 2023 12:56 PM