नवनीत राणा यांचा विरोधकांना टोला, स्वप्न पाहायला पैसे….
अमरावती मतदारसंघाची खासदार झाल्यापासून मी पाच वर्षे प्रामाणिकपणे काम केले. काम दाखवून मगच तुम्हाला मत मागेल. फुकट मतदान मागणार नाही.
अमरावती : अमरावती मतदारसंघाची खासदार झाल्यापासून मी पाच वर्षे प्रामाणिकपणे काम केले. काम दाखवून मगच तुम्हाला मत मागेल. फुकट मतदान मागणार नाही. पण काही लोक जिल्हा परिषद सदस्य असतानाही त्यांनी काही काम केले नाही. फक्त श्रेय घेण्याचे काम केले. ते लोक श्रेय घेण्यासाठीच बनले आहेत. काही लोक दिवसा स्वप्न पाहतात. पण, स्वप्न पाहायला पैसे लागत नाही. दिवसा तर अजिबातच लागत नाही असा टोला खासदार नवनीत राणा यांनी लगावला. अंजनगाव सुर्जी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या लोकार्पणावेळी त्या बोलत होत्या. मविआचे लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून आमदार बळवंत वानखडे यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी विरोधकांना हा टोला लगावला आहे.
Published on: Jun 05, 2023 07:08 PM
Latest Videos