Amravati Murders Case: महाविकास आघाडी सरकारने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला; अमरावती हत्या प्रकरणी खासदार नवनीत राणा आक्रमक
महाविकास आघाडी सरकारने प्रकरण दाबल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी व्हावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.
अमरावती: अमरावतीच्या उमेश कोल्हे(Umesh Kolhe) हत्याप्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी नवनीत राणा(MP Navneet Rana) यांनी उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. महाविकास आघाडी सरकारने प्रकरण दाबल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलीस आयुक्त आरती सिंग व तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकुर यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. उमेश कोल्हे हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे असेही राणा म्हणाल्या.
Published on: Jul 03, 2022 10:21 PM
Latest Videos