हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाआड ठाकरेंवर नवनीत राणा निशाना साधणार?
हनुमान चालिसा पठण आणि भोंग्यावरून आमदार रवी राणा आणि पत्नी खासदार नवनीत राणा यांनी राण उठवलं होतं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मातोश्री निवासस्थानी जाऊन आपण हनुमान चालिसा पठण करणार असा हट्टच त्यांनी धरला होता
अमरावती : खासदार नवनीत राणा, उद्धव ठाकरे आणि हनुमान चालिसा पठण प्रकरण काही नवीन नाही. ठाकरे हे मुख्यमंत्री असताना हनुमान चालिसा पठण आणि भोंग्यावरून आमदार रवी राणा आणि पत्नी खासदार नवनीत राणा यांनी राण उठवलं होतं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मातोश्री निवासस्थानी जाऊन आपण हनुमान चालिसा पठण करणार असा हट्टच त्यांनी धरला होता. यादरम्यान, नवनीत राणांना १४ दिवस तुरुंगातही जावं लागलं होतं. त्यानंतर आजपर्यंत राणा यांचा राग ठाकरे यांच्यावर दिसून येत आहे. आता नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती जिल्ह्यात सामूहिक हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम होणार आहे. याची जय्यत तयारी देखील सुरू आहे. 6 एप्रिलला हनुमान चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बडनेरा मार्गावरील वीर हनुमानजी खंडेलवाल लॉन येथे हा हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या भक्तांना चांदीचा शिक्का आणि हनुमान चालिसा पुस्तिका भेट म्हणून देण्यात येणार आहे.