निलेश लंके यांचे जनआक्रोश आंदोलन, पत्नी आणि आईने आंदोलन स्थळी चुल पेटविली
कांदा आणि दूधासाठी हमीभाव मिळण्यासाठी कायदा करावा म्हणून आता दिल्ली सारखे आंदोलन राज्यातही सुरु झाली आहेत.नगर जिल्ह्यात खासदार निलेश लंके यांनी साखळी उपोषण आंदोलन सुरु केले आहे.
शेतकऱ्यांच्या कांदा आणि दूधाला हमी भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांसाठी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके आणि त्याची आईने चुल पेटविली आहे. जोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार तोपर्यंत येथील चूल पेटविली जाणार आहे. कांदा आणि दूधाला हवी भाव देण्याची राज्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. या संदर्भात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नुकतीच शेतकऱ्यांच्यासाठी देखील ‘किमान हमीभाव कायदा’ करावा अशी मागणी केली आहे. जर सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी भावाने शेतीमाल खरेदी करण्यावर बंदी येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. ज्याप्रमाण मजूरांसाठी किमान वेतन कायदा आहे तसाच शेतकर्यासाठी किमान हमीभाव कायदा हवा अशी आमची मागणी असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. दरम्यान, दूधाला भाव मिळण्यासाठी अकोले तालुक्यातील गणोरे गावात शुभम आंबरे आणि संदिप दराडे या तरुणांचेही उपोषण सुरु असून आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. दुधाला किमान 40 रुपये हमीभाव मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. गणोरे, हिवरगाव, डोंगरगाव, विरगाव, पिंपळगाव, समशेरपूर, देवठाण,वडगाव लांडगा,कळस, गुंजाळवाडी,सावरगाव पाटया दहा गावात कडकडीत बंद पाळून उपोषणाला पाठींबा दिला आहे.