शरद पवार यांना अजित पवार गटातील नेत्यानं लागवला टोला, म्हणाला, ‘आम्ही बाळ राहिलो नाही’
भंडाऱ्यात अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल हे पक्षातील बंडानंतर पहिल्यांच गेले. त्यावेळी त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना टोला लगावलाय.
भंडारा : 24 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाल्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल हे पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात पोहोचले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाच्या वेळी त्यांनी शरद पवारांना टोला लगावला. तर पवारांची जर सभा झाली तर, त्या सभेला गर्दी झाली पाहिजे म्हणत कार्यकर्त्यांना सुचना केल्या. तसेच पवार आपल्या जिल्ह्यात आलेत तर, मी स्वतः स्वागतासाठी जाणार असून तुम्ही पण या. गर्दी जमवण्यासाठी आपण जावू, त्यांच स्वागत करू असंही ते यावेळी म्हणाले. तर भाषणात आपल्याविरोधात पवार काही बोलले तरी ते ऐकून घेऊ असाही उपरोधिक टोला पटेल यांनी पवार यांना लगावला. राष्ट्रवादी पक्ष हा आपलाच असून याच गट तट नाही. घड्याळही आपलंच असून कुणाच्याही मनात शंका नको. आयुष्यात सर्वांना कधी ना कधी महत्वाचा निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे आम्ही बाळ राहिलो नाही. विरोधात असताना काम होत नसल्यानं विकासासाठी सत्तेत गेलो. इंडीयात खेकड्यांसारखे एकमेकांचे पाय ओढतात. तर शरद पवार नेते होते, आहेत आणि राहणार. त्यांचा आदर कमी होणार नाही असे सांगताना तात्पुरती नाराजी असेल, त्यामुळे दुरावा असेल. आम्ही घेतलेला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून घेतलेले आहे. शेवटपर्यंत राष्ट्रवादी सोबत राहू असेही ते म्हणालेत.