ठाकरे गट पुन्हा फूटणार? आणखी इतके खासदार आणि आमदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार? 'या' खासदाराचा दावा...

ठाकरे गट पुन्हा फूटणार? आणखी इतके खासदार आणि आमदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार? ‘या’ खासदाराचा दावा…

| Updated on: Aug 14, 2023 | 9:22 AM

तर गेल्या एका वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला तर खिंडार पडणे सुरूच आहे. ठाकरे गटातून नेते हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याचदरम्यान आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता असून तसा दावाच शिंदे गटातील खासदार यांनी केला आहे.

बुलढाणा, 14 ऑगस्ट 2023 | आगामी लोकसभा आणि महापालिंकाच्या निवडणुकांमुळे सध्या राज्यात राजकीय उलथा पालथ पाहायला मिळत आहे. येथे अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊट गोईंग सुरू असल्याचे दिसत आहे. तर गेल्या एका वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला तर खिंडार पडणे सुरूच आहे. ठाकरे गटातून नेते हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याचदरम्यान आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता असून तसा दावाच शिंदे गटातील खासदार यांनी केला आहे. तर ठाकरे गटातील 2 खासदार आणि 8 आमदार लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील असा दावाच शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. त्यामुळे सध्या एकच खळबळ उडालेली आहे. तर खासदार जाधवांच्या या दाव्याची चर्चा सुरू झाली आहे. जाधव यांनी, ठाकरे गटातील दोन खासदार आणि तब्बल आठ आमदार आमच्या संपर्कात आहेत, ते लवकरच शिंदे यांच्या शिवसेना सोबत सहभागी होतील, असा दावा केलाय. त्यामुळे ठाकरे गटात मोठ खिंडार पडणार? दोन खासदार आणि आठ आमदार शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर हे खासदार आणि आमदार नेमके कोण? याबाबत गुप्ताता ठेवण्यात आली असून त्यांची नावे मात्र खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगणे जाणीवपूर्वक टाळले आहे.

Published on: Aug 14, 2023 09:21 AM