शिवसेना ठाकरे गटाच्या महिला नेत्याकडून नारायण राणे यांचा खरपूस समाचार, ‘त्या’ भाषणावर केली जोरदार टीका
यावेळी राज्यातील एक मेकांचे विरोधक असणारे शिंदे गट आणि ठाकरे गटातील खासदार लोकसभेतच भिडले. तर शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं.
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2023 । केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव आणला आहे. त्यावर काल चर्चा झाली. यावेळी राज्यातील एक मेकांचे विरोधक असणारे शिंदे गट आणि ठाकरे गटातील खासदार लोकसभेतच भिडले. तर शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. त्याचबरोबर आपल्या भाषणाच्या दरम्यान राणे यांनी सावंत यांचा एकेरी उल्लेख करताना, ये बस खाली असं दोन ते तीन वेळा म्हटलं. त्यावरून ठाकरे गटाकडून आता टीका होत आहे. याचमुद्द्यावरून खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राणेंचा तो व्हिडिओ ट्विट करताना टीका केली आहे. चतुर्वेदी यांनी हा माणूस मंत्री आहे. इथे तो या सरकारचा दर्जा किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो हे दाखवताना दिसत आहे अशी टीका केली आहे.
Published on: Aug 09, 2023 10:24 AM
Latest Videos