‘ब्रिटिशांच्याहीपेक्षा भयंकर कायदे निर्माण केलेत’; मलिक कसे सुटले? यावरही राऊत यांचे भाष्य, पाहा काय म्हणाले राऊत...

‘ब्रिटिशांच्याहीपेक्षा भयंकर कायदे निर्माण केलेत’; मलिक कसे सुटले? यावरही राऊत यांचे भाष्य, पाहा काय म्हणाले राऊत…

| Updated on: Aug 12, 2023 | 1:08 PM

त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटासह अजित पवार गटाकडून जल्लोष साजरा केला जात आहे. मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दीड महिन्यासाठी जामीन मंजूर केला असून त्यांची 17 महिन्यानंतर जामीनावर सुटका होणार आहे.

मुंबई, 12 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना काही कालावधीसाठी का असेना पण सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटासह अजित पवार गटाकडून जल्लोष साजरा केला जात आहे. मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दीड महिन्यासाठी जामीन मंजूर केला असून त्यांची 17 महिन्यानंतर जामीनावर सुटका होणार आहे. याचमुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. यावेळी राऊत यांनी, केंद्राने काल देशद्रोहाचा कायदा रद्द केला. पण या कायद्यास मागे टाकणारे कायदे भाजपने केल्याचा घणाघात त्यांनी केला. तसेच ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना निरमा पावडर ने स्वच्छ करून मंत्री केलतं. ते ही तुरूंगात जाण्याच्या वाटेवर असताना असा आरोप केलाय. तर नवाब मलिक हे कसे सुटले हे सांगताना त्यांनी वेगळाच दावा केलाय. पाहा कोणता दावा केला आहे राऊत यांनी…

Published on: Aug 12, 2023 01:08 PM