कमळाची भूरळ? मंडलिक यांनी स्पष्टच सांगितलं '2024 ला लढवणार की....' चिन्हावरूनही केलं भाष्य

कमळाची भूरळ? मंडलिक यांनी स्पष्टच सांगितलं ‘2024 ला लढवणार की….’ चिन्हावरूनही केलं भाष्य

| Updated on: Jun 18, 2023 | 7:39 AM

येथे विद्यमान खासदार संजय मंडलिक हे भाजपच्या चिन्हावर 2024 ला निवडणुकीच्या मैदानात उतरणार असं बाललं जात आहे. तर त्यांचा प्रचार राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना करावा लागणार आहे. तर 2019 ला मंडलिक यांनी त्यांचा पराभव केला होता.

कोल्हापूर : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांच्या पातळीवर या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच कोल्हापूर लोकसभा मतदार संघावरून गेली दोन चार दिवस कमालीच्या चर्चा सुरू आहेत. येथे विद्यमान खासदार संजय मंडलिक हे भाजपच्या चिन्हावर 2024 ला निवडणुकीच्या मैदानात उतरणार असं बाललं जात आहे. तर त्यांचा प्रचार राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना करावा लागणार आहे. तर 2019 ला मंडलिक यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे ते यंदा आमचं ठरलयं म्हणत प्रचारातून बाजूला होतील आणि मंडलिकांचा गेम होईल असंही चर्चा रंगली आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर मंडलिक यांच्याशी संवांद साधला असता त्यांनी आपण 2024 ची निवडणूक लढवणारच असं म्हटलं आहे.

तर ‘लोकसभा निवडणुकीत मी भाजपचा उमेदवार असणार ही दिशाभूल करणारी बातमी आहे. या पारावरच्या अर्थहीन गप्पा आहेत. बारामतीचे काही ज्योतिषी कोल्हापुरात आलेत का? त्यांच्याकडून अशा वावड्या उठवल्या जातात का? हे बघावे लागेल. कारण अशा चर्चा करण्यात काही अर्थ नाही. तर महाडिक हे आपले जुने मित्र आहेत. गेल्या निवडणुकीत ते माझ्या विरोधात असले तरी, त्यावेळचे राजकारण वेगळे होते. त्यावेळी भाजप-शिवसेनेचा मी उमेदवार होता. आताही आहे, त्यामुळं महाडिक यांच्यासह भाजपचे लोक माझा प्रचार करतील, असा दावाही मंडलिक यांनी यावेळी केला.

Published on: Jun 18, 2023 07:39 AM