कोल्हापुरात नक्की घडतयं तरी काय? ज्यानं 2019 मध्ये पराभव केला आता त्याच्यासाठी 2024 मध्ये पळावं लागणार?

कोल्हापुरात नक्की घडतयं तरी काय? ज्यानं 2019 मध्ये पराभव केला आता त्याच्यासाठी 2024 मध्ये पळावं लागणार?

| Updated on: Jun 17, 2023 | 10:59 AM

कोल्हापुरात आता शिंदे गटाचे दोन्ही विद्यमान खासदार हे भाजपच्या गळाला लागल्याचे बोलले जात आहे. कारण हे दोन्ही खासदार शिंदे गटाच्या शिवसेना चिन्हावर नाही तर भाजपच्या चिन्हावर निवडणुकीत उतरण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात होते.

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता अनेक पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. तर अनेक विद्यमान खासदारांनी आपन परत मौदान उतरणार असल्याचे दाखवले आहे. यातून कोल्हापुरात आता शिंदे गटाचे दोन्ही विद्यमान खासदार हे भाजपच्या गळाला लागल्याचे बोलले जात आहे. कारण हे दोन्ही खासदार शिंदे गटाच्या शिवसेना चिन्हावर नाही तर भाजपच्या चिन्हावर निवडणुकीत उतरण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात होते. तर हे दोघेही मध्यंतरी भाजपच्या एका सभेत एकाच व्यासपीठावर होते. त्यातच आता शिंदे गटाला थेट धोक्याचीच घंटा मिळाली आहे. कारण खासदार संजय मंडलिक हे भाजपच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. तर भाजपकडून खासदार धनंजय महाडिक यांची कोल्हापूर लोकसभेच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता महाडिक यांच्यासमोर धर्मसंकंट उभे राहिलं आहे. त्यांना 2019 ला ज्यांनी पराभव केला, त्याचं मंडलिकांसाठी महाडिक यांना धडपडावं लागणार आहे. अवघ्या चार वर्षात राजकारणातील समीकरण बदलली आहेत. 2019 ला सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय, म्हणत संजय मंडलिक यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. तर धनंजय महाडिक यांना मात दिली होती. त्यामुळे आता शिंदे गटाकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पहावं लागणार आहे.

Published on: Jun 17, 2023 10:58 AM