‘2019 ला महाडिक विरोधात पण अमित शाहांनी…’; संजय मंडलिक यांनी केला कोणता दावा?
सध्या महाडिक हे भाजपचे राजसभेचे विद्यमान खासदार आहेत. तर त्यांच्यावर कोल्हापूरची प्रचार प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मंडलिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहे. तर ते आता भाजपच्या चिन्हावर निवडणूक मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.
कोल्हापूर : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीच्या माजी खासदार धनंजय महाडिक यांना पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मंडलिक आणि महाडिक यांच्याबाबतीत अनेक चर्चा रंगल्या आहेत. सध्या महाडिक हे भाजपचे राजसभेचे विद्यमान खासदार आहेत. तर त्यांच्यावर कोल्हापूरची प्रचार प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मंडलिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहे. तर ते आता भाजपच्या चिन्हावर निवडणूक मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.
यावरून सध्या ज्यांनी परभव केला आता त्यांच्याचसाठी प्रचार करावा लागणार अशी गत महाडिकांची झाल्याची चर्चा आहे. यावरून मंडलिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी, ‘राज्यात भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना चांगले काम करत आहे. भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विद्यमान खासदारांनाच उमेदवारी देण्याचा शब्द दिला आहे, त्यामुळे मी आगामी लोकसभा निवडणूक शिवसेनेतूनच लढवणार’, मंडलिक यांनी सांगितलं आहे. तर युती असल्याने महाडिक यांना ते करावं लागले. पण 2019 ला त्यांचा पराभव केला ही आता जुनी गोष्ट झाली आहे. ते माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे 2024 ला त्यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे नेते माझा प्रचार करतील.