मुळातच राऊत ठाकरे फॅमिलीशी लॉयल नाहीत; शिवसेनेच्या नेत्याचा जोरदार हल्ला
शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी राऊत यांच्यावर टीका करत राऊत हे पाप करतात. ते लोकांची मनं दुखावतात आणि राऊत हे रोजच करतात
अयोध्या : राज्यामध्ये ज्यांनी पाप केलं अयोध्येला जात असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदार खासदार यांच्यावर केली होती. तसेच राम त्यांना आशीर्वाद देणार नाही. त्यांना माफ करणार नाही. यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी राऊत यांच्यावर टीका करत राऊत हे पाप करतात. ते लोकांची मनं दुखावतात आणि राऊत हे रोजच करतात. त्यामुळे त्यांनी गंगेत जाऊन स्नान केलं पाहिजे. पाप मुक्त झालं पाहिजे. खरं तर ते मुळातच ठाकरे फॅमिलीशी लॉयल नाहीत. ते पवारांचे आहेत आणि पवारांसाठीच काम करतात. राष्ट्रवादीसाठी काम करतात. तर राष्ट्रवादीने त्यांना जी ड्युटी दिलेली होती, शिवसेना पडायची ती त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे माझी खात्री आहे की त्यांचे आता समाधान झालेलं असेल. आता त्यांनी शांत राहणं योग्य होईल.