maharashtra politics : ‘शिंदे यांनी शिवसेना फोडली नाही, त्यांच्यात ताकद नव्हती, ती फोडली...’ ; राऊत यांचा कोणावर घणाघात?

maharashtra politics : ‘शिंदे यांनी शिवसेना फोडली नाही, त्यांच्यात ताकद नव्हती, ती फोडली…’ ; राऊत यांचा कोणावर घणाघात?

| Updated on: Jun 10, 2023 | 12:04 PM

शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटासह भाजपवर आपला निशाना साधला आहे. तसेच शिवसेनेतील बंडखोरी, पक्षफुटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीकाही केली आहे.

मुंबई : राज्यात शिंदे गट आणि भाजपचे युती सरकार येऊन एक वर्ष पूर्ण होणार आहे. यावरून शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटासह भाजपवर आपला निशाना साधला आहे. तसेच शिवसेनेतील बंडखोरी, पक्षफुटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीकाही केली आहे. यावेळी त्यांनी थेट शिवसेना फुटण्याला शिंदे जबाबदार नसल्याचं सांगत एक प्रकारे त्यांना क्लिनचीट दिला आहे. तर याप्रकरणी त्यांनी, शिवसेना एकनाथ शिंदेंनी फोडली हे खोटं आहे. खरं म्हणजे हा पक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी फोडला, हा भाजपाने फोडला आहे. हा त्यांनी घेतलेला सूड आहे. त्यांनी सत्तेचा गैरवापर केला. शिंदेंमध्ये काहीच ताकद दोन चार आमदारांना फोडण्याची. मात्र केंद्रीय तपास संस्थांचा धाक दाखवून शाहांनी शिवसेना फोडली.

Published on: Jun 10, 2023 11:50 AM