बावनकुळे यांच्या ‘त्या’ टीकेवर राऊत भडकले; म्हणाले, ‘कोण बावनकुळे?’
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर काल टीका केली होती. त्यावेळी त्यांनी घरात बसून पक्ष चालविणारे कुणाला संपवू शकत नाहीत असा निशाना साधला होता.
नागपूर : 24 ऑगस्ट 2023 | ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांच्याशी मी पॅचअप करू शकत नाही असे वक्तव्य केलं होतं. तर भाजपसोबत आपण कसे जाऊ असा सवालच कार्यकर्त्यांना केला होता. तर ज्यांची मनचं तिथं होतं त्यांना मी कसा अडवणार असे म्हटलं होतं. तर ज्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली आता त्यांच्या चूकीला माफी नाही. त्यांना गाढायचं असेही टीका शिवसेना शिंदे गटावर देखील निशाना साधला होता.
बावनकुळे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करताना जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी, घरात बसून पक्ष चालविणारे कुणाला संपवू शकत नाहीत असा टोला ठाकरे यांना लगावला. तसेच 2024 पर्यंत ठाकरे यांच्या स्टेजवर फक्त ४ ते ५ च लोक तुम्हाला दिसतील असा दावाही बावनकुळे यांनी केला.
कोण बावनकुळे?
त्यावर आता राजकारण तापलेलं असून यावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दोनच शद्बात प्रतिक्रिया दिली आहे. तर थेट कोण बावनकुळे? कोण आहेत ते बावनकुळे? मी नाही ओळखत असे राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता बावनकुळे आणि राऊत यांच्यातील वाकयुद्ध पुढे रंगत का आता हे पाहवं लागणार आहे.