Sanjay Raut : ‘.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?’ राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी
Sanjat Raut On Raj Thackeray : शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्याचा उल्लेख काल ठाकरेंनी पाडवा मेळाव्यात केला होता. त्यानंतर राऊतांनी ही टीका केली.
राज ठाकरे यांनी काल फडणवीसांच्या चांगल्या कामाची यादी जाहीर करायला हवी होती, असा खोचक टोला आज शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे. काल झालेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्याचा उल्लेख केला. त्यावर आज संजय राऊत यांनी टीका केली.
यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्राची पीछेहाट सुरू आहे, महाराष्ट्रातून उद्योग बाहेर चालले, चांगले काम आहे का? कुणाल कामरा यांचा स्टुडिओ फोडला, हे चांगले काम आहे का? मुंबईत आणि महाराष्ट्रात मराठी व्यक्तीला घर नाकारले जात आहे. मराठी संस्कृतीवर हल्ला होत आहेत. हे चांगलं काम असेल तर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणे ही राष्ट्राची गरज आहे, असा टोमणा देखील राऊतांनी लगावला.
पुढे राऊत म्हणाले की, मराठी माणसाच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तीच्या कानाखाली मारण्याची भाषा राज ठाकरे यांनी केली. ती मरायलाच हवी. मात्र मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या शिवसेना संघटनेची स्थापना केली. ती संघटना भाजपने तोडली आणि उद्ध्वस्त केली. हा मराठी माणसाच्या एकजुटीवर सर्वात मोठे हल्ला आहे. अशावेळी राज ठाकरे कोणाच्या कानाखाली काढणार? असा प्रश्न देखील राऊतांनी उपस्थित केला.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल

दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय

साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा

मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
