शिंदे गटाला संजय राऊत यांचे थेट आव्हानच; म्हणाले, “तर परत येतील का?”
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना आपल्या सोबत घेत उद्धव ठाकरे यांनी राम राम तर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यावेळी शिवसेना फूटण्याचे कारण शिंदे यांच्या सह शिंदे गटातील आमदार आणि खासदार यांनी खासदार संजय राऊत असल्याचे सांगितले.
सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात एक वर्षांपुर्वी मोठा राजकीय भूकंप झाला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना आपल्या सोबत घेत उद्धव ठाकरे यांनी राम राम तर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यावेळी शिवसेना फूटण्याचे कारण शिंदे यांच्या सह शिंदे गटातील आमदार आणि खासदार यांनी खासदार संजय राऊत असल्याचे सांगितले. तर आजही शिंदे गट राऊत यांनाच पक्ष फूटण्याचे कारण मानतो. यावरून राऊत यांनी मोठं विधान करताना शिंदे गटाला थेट आव्हान देत सवाल केला आहे. ते सोलापूर येथे पांडुरंगाचा दर्शनासाठी गेले असताना बोलत होते. यावेळी राऊत यांनी, माझ्यामुळे उद्धव ठाकरेंची साथ सोडली, असे शिंदे गट म्हणत असतो. तर मी बाजूला होतो. मात्र हे गेलेले 40 आमदार परत येणार आहेत का असा सवाल केला आहे. तर सतत माझ्यामुळे शिवसेना सोडली असे हे म्हणतात, तर एक उदाहरण तरी या आमदारांनी दाखवावे. 50 कोटिंसाठी त्यांनी पक्ष फोडला असा घणाघाती सवाल केला आहे.