औरंगजेबजी शब्दावरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा, जे पोटात होत तेच ओठावर आलं...

औरंगजेबजी शब्दावरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा, जे पोटात होत तेच ओठावर आलं…

| Updated on: Jan 05, 2023 | 4:23 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. यावेळी त्यांनी आज औरंगजेबजी असा उल्लेख केला आता ते कसाबजी, मग अफजल गुरूजी असाही उल्लेख करतील अशी टीका केली आहे.

मुंबई : सध्या वादग्रस्त विधानावरून राज्यात वादंग माजले आहे. त्यात अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपण आपल्या वक्त्यावर ठाम असल्याचे जाहिर केलं. तर जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा क्रूर होता म्हणत सावरासवर केली. यानंतर मात्र वादग्रस्त वक्तव्यावरून आंदोलने करणाऱ्याच भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी वादग्रस्त विधान केलं. त्यावरून आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आव्हाड यांच्यावर टीका करताना औरंगजेब याचा औरंगजेबजी असा उल्लेख केला आणि नवा वाद सुरू झाला. त्यावर आता राऊत यांनी टीका केली आहे. यावेळी राऊत यांनी यांच्या पोटात जे होतं तेच ओठावर आलं. असे म्हटलं आहे.

त्याचबरोबर टीका करताना रात्रत यांनी आज औरंगजेबजी असा उल्लेख केला आता ते कसाबजी, मग अफजल गुरूजी असाही उल्लेख करतील अशी टीका केली आहे.

Published on: Jan 05, 2023 04:23 PM