‘बीआरएस म्हणजे नवा एमएमआय…, नियतमध्येच खोट’; केसीआर यांच्या माऊलींच्या दर्शनावरून राऊत यांची टीका
तर सोलापूरात ते शक्ती प्रदर्शनासह पंढरपूर येथे माऊलींचे दर्शन घेणार आहेत. यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यांनी केसीआर यांची नियतमध्ये खोट दिसत असल्याचं सांगताना ते दुसरे एमएमआय असल्याचं म्हटलं आहे.
मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) हे त्यांचं गुलाबी वादळ घेऊन हैदराबादहून निघाले आहेत. ज्यात 400 गाड्यांचा ताफा आणि त्यांचे आमदार खासदार आहेत. तर सोलापूरात ते शक्ती प्रदर्शनासह पंढरपूर येथे माऊलींचे दर्शन घेणार आहेत. यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यांनी केसीआर यांची नियतमध्ये खोट दिसत असल्याचं सांगताना ते दुसरे एमएमआय असल्याचं म्हटलं आहे. कारण त्यांच्यासमोर तेथे काँग्रेसचे आव्हान आहे. तर येथे भाजपसमोर मविआचे. पण येथे त्यांना जसे काँग्रेस-राष्ट्रवादीला कंमजोर करण्यासाठी एमएमआयला भाजपने पाठवले तसेच आता बीआरएस महाराष्ट्रात पाठलं आहे. तर केसीआर यांना आत्ताच कसं काय माऊली आठवले. याच्याआधी ही ते नेते होते. त्यानंतर ते तेलंगणांचे मुख्यमंत्री झाले. आणि आता पक्ष वाढविण्यासाठी ते महाराष्ट्रात हात पाय मारत आहेत अशी टीका केली आहे.