‘स्वत:चे, स्वत:च्या वडिलांचे फोटो का वापरत नाही?’, संजय राऊत यांची खोचक टीका
शरद पवार यांनी त्यांचे फोटो वापरू नयेत असा दम अजित पवार गटाला भरला आहे. तसेच जे आपले फोटो वापरतील त्यांच्यावर कायदेशिर कारवाई देखील करू असे देखील त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई : 17 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अजित पवार आणि त्यांच्या गटाने फूट पाडली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीत दोन गट बनले आहेत. तर राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतरही अजित पवार गटाकडून शरद पवार यांचा फोटो वापरला जात आहे. त्यावरून शरद पवार यांनी याच्या आधी देखील अजित पवार गटाला आपला फोटो वापरू नका असे म्हटलं होते. तर आता थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. मात्र अजित पवार गाटकडून ते आमचे नेते, दैवत असल्याने आम्ही त्यांचा फोटो वापरणारच अशी भूमिका घेण्यात आली आहे. त्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गटावर तोफ डागली आहे. यामुद्द्यावर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरला जातो, तसाच शरद पवारांचाही फोटो आता वापरला जातोय. शरद पवार यांना दैवत म्हणता तर मग पाठीत खंजीर का खुपसला? असा सवाल राऊत यांनी यावेळी केला आहे. त्याचबरोबर राऊत यांनी यावेळी शरद पवार हे आमचे नेते म्हणने हे ढोंग असल्याची टीका देखील अजित पवार गटावर हल्लाबोल केला आहे. याचबरोबर त्यांनी आणखीन काय टीका केली आहे ते पाहा…