UN ला पत्र लिहून संजय राऊत करणार कोणती मागणी? शिंदे गटाबाबत काय म्हणाले?
एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाकडून. जो गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. तर दुसरा ठाकरे पक्षाचा पारंपारिक वर्धापन दिन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे.
मुंबई : शिवसेनेच्या स्थापनेचा आज वर्धापन दिन. आज शिवसेनेला 57 वर्षे झाली त्यानिमित्ताने शिनसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र यावेळी दोन वर्धापन दिन होत आहे. एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाकडून. जो गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. तर दुसरा ठाकरे पक्षाचा पारंपारिक वर्धापन दिन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी शिंदे गटावर टीका करताना आपण 20 जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून घोषित करावा अशी मागणी पत्राने UN ला करणार असल्याचे म्हटलं आहे. तर 19 जून हा निष्ठावांतांचा दिवस आहे. मात्र 20 जून हा जागतिक गद्दार दिन आहे. तर काही विशेष दिवस साजरे करण्यासाठी UN कडून काही निर्णय घेतले जातात. तर आम्ही महाराष्ट्राच्या लाखो जनतेच्या सहीने UN पत्र लिहणार आहे. UN ला 20 जून जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्याची मान्यता द्यावी म्हणून विनंती करणार असल्याचे ते म्हणाले. तर शिंदे गट हा गद्दार असल्यानेच आमचा भाजप, आमचे मोदी, आमचे शाह, आमचे फडणवीस असे म्हणतात. मात्र आम्ही कधी तसे म्हणालो नाही. आम्ही म्हणायचो आमचे बाळासाहेब, आमचे अटल बिहारी वाजपेयी, आमचे अडवाणी असा टोला लगावला आहे.