पालिसांचा राजकीय वापर सुरू असून सत्ता कायम राहणार नाही; राऊतांचा थेट इशारा

पालिसांचा राजकीय वापर सुरू असून सत्ता कायम राहणार नाही; राऊतांचा थेट इशारा

| Updated on: Mar 07, 2023 | 6:22 PM

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला इशारा दिला. राऊत यांनी शिंदे गटाला मर्द असाल तर समोर या असं म्हटलं आहे

ठाणे : खरी शिवसेना कोणाची हा वाद सुरू असतानाच निवडणूक आयोगाने आपला निकाल दिला. त्यात शिवसेना आणि चिन्ह हे शिंदे गटाला देण्यात आलं. त्यानंतर शाखांवरून राज्यात राडा होणार की काय अशीच पाल अनेकांच्या मनात चुकचूकत होती. त्याप्रमाणे ठाण्यात शाखेचा वाद ऐरणीवर आला. ठाण्यातील शिवाईनगर येथे शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गट आमनेसामने आले. त्यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला इशारा दिला. राऊत यांनी शिंदे गटाला मर्द असाल तर समोर या असं म्हटलं आहे. तर आमच्या विरोधात पालिसांचा राजकीय वापर सुरू आहे. पण सत्ता कायम राहणार नाही असा इशारा ही त्यांनी शिंदे गटाला दिला.

Published on: Mar 07, 2023 06:22 PM