Sanjay Raut | नोटबंदी वैध कशी ?, हा प्रश्न लोकांच्या मनात : संजय राऊत
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरही बोलताना ती वैध्य कशी असा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात असल्याचेही म्हटलं आहे. तर अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नोटबंदीवरून आलेल्या निर्णयानंतर जे मृत्यूमुखी पडले त्याला जबाबदार कोण या प्रश्नाशी सहमत असल्याचे म्हटलं आहे
मुंबई : राज्य सध्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे गाजत आहे. सध्या अजित पवार यांच्या विधानावर बाजपसह अनेक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. तर निषेध ही व्यक्त करत आहेत. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटासह भाजपवर निशाना साधला.
तसेच वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल पदावर कसे राहतात आणि त्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस एक शब्द ही कसे काय बोलू शकत नाहीत असा सवाल केला आहे.
तसेच राऊत यांनी ज्या प्रकारे आज हे भाजपवाले वादग्रस्त विधानाबाबत रस्त्यावर उतरलेत तसेच राज्यपालांच्या बाबतीत ही उतरावे आम्ही त्यांचे करू असेही म्हटलं आहे. तर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नोटबंदीवरून आलेल्या निर्णयानंतर जे मृत्यूमुखी पडले त्याला जबाबदार कोण असा सवाल केला होता. त्यावर आपण सहमत असल्याचेही राऊत यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरही बोलताना ती वैध्य कशी असा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात असल्याचेही म्हटलं आहे