कायदा व सुव्यवस्था ची लक्तरे वेशीवर; परब यांची सरकारवर टीका
राऊत यांना आलेल्या धमकीवर परब यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थाची लक्तरे ही वेशीवर टाकली जात आहेत.
छ. संभाजीनगर : खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर राज्यातील वातावरण गरम झाले आहे. यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होताना दिसत आहे. राऊत यांना धमकी देणाऱ्यावर कारवाई करण्यासह लोकप्रतिनिधींना अशा धमक्या देणाऱ्याबाबत सरकार जागृक नाही अशी टीका होत आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. तसेच या सरकारला या विषयात काहीच रस दिसत नाही असा टोला ही लगावला आहे.
राऊत यांना आलेल्या धमकीवर परब यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थाची लक्तरे ही वेशीवर टाकली जात आहेत. असा पद्धतीने लोकप्रतिनिधींना धमक्या येत आहेत. मात्र सरकार त्यांचा बंदोबस्त करण्याचा अपयशी ठरत आहे. जर लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसाचं काय हा प्रश्न या निमित्ताने त्यांनी विचारला आहे.