‘लोक का सोडून जातायत याचं आधी आत्मपरिक्षण करावं’; श्रीकांत शिंदे यांचा ठाकरे यांना टोला

‘लोक का सोडून जातायत याचं आधी आत्मपरिक्षण करावं’; श्रीकांत शिंदे यांचा ठाकरे यांना टोला

| Updated on: Jul 30, 2023 | 8:56 AM

ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात घेण्यात आलेल्या मेळाव्यात ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. तसेच भाजप आणि शिंदे यांना खडे बोल सुनावताना, एकेकाला काय फोडता हिंमत असेल तर निवडणुका घ्या, असे आव्हान केले आहे.

ठाणे, 30 जुलै 2023 | माजी मुख्यमंत्री ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिंदे गट, भाजपवर जोरदार टीका केली. ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात घेण्यात आलेल्या मेळाव्यात ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. तसेच भाजप आणि शिंदे यांना खडे बोल सुनावताना, एकेकाला काय फोडता हिंमत असेल तर निवडणुका घ्या, असे आव्हान केले आहे. या आव्हानाला आता शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी, निवडणुका व्हायच्या तेव्हा होतील. मात्र लोक तुम्हाला का सोडून जातायत याचा विचार करणार आहात की नाही असा सवाल केला आहे. तर लोक का जात आहेत याचंही आत्मपरीक्षण करा, आपलं काय चुकतयं ते पाहा असा उपहासात्मक सल्ला दिला आहे. त्यामुळे आता यावर ठाकरे गटाकडून कोणती प्रतिक्रिया येते हे आता पाहावं लागेल.

Published on: Jul 30, 2023 08:56 AM