Video | मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर मी कसा? श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट सांगितलं…
आज मी दोन टर्मचा खासदार आहे. मला माहिती आहे, कुठे बसायचं आणि कुठे नाही बसायचं... असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या खुर्चीवर त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) बसल्याचा फोटो आज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी टीव्ही9 शी बोलताना स्पष्टीकरण दिलंय. ही आमची घरातली तात्पुरती व्हीसीसाठी व्यवस्था केलेली आहे. बाहेर मुख्यमंत्र्यांचा बोर्ड लावलाय, तिथेही मी उभा राहिलो तर त्याचा वेगळा अर्थ लावला जाईल. यातून कोणताही अर्थ काढायची गरज नाही… मुख्यमंत्र्याचा बोर्ड माझ्या मागे असल्याची मला कल्पनाही नाही. या सगळ्या गोष्टी अनावधानाने झाल्या असतील. पण याचा बागुलबुवा करण्याची गरज नाही. आज मी दोन टर्मचा खासदार आहे. मला माहिती आहे, कुठे बसायचं आणि कुठे नाही बसायचं… असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
Published on: Sep 23, 2022 02:34 PM
Latest Videos