सुप्रिया सुळे यांचे हिंदू-मुस्लीम संघर्षावर मोठं वक्तव्य; विचारला प्रश्न? म्हणाल्या, ‘लस कशी चालते?’
याच मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांची तुफान फटकेबाजी पहायला मिळाली. त्यांनी यावेळी भाजपला आणि हिंदूत्वावर बोलणाऱ्यांना चांगलचं फैसावर घेतलं. कोरोना काळाचा दाखला देताना, रेमडेशिवीरसाठी लोकांना कमी धावपळ करावी लागत होती.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत कार्यकर्त्यांच्या मेळावा घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आप आपली मनोगते व्यक्त केली. ज्याची आज चर्चा होत आहे. याच मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांची तुफान फटकेबाजी पहायला मिळाली. त्यांनी यावेळी भाजपला आणि हिंदूत्वावर बोलणाऱ्यांना चांगलचं फैसावर घेतलं. कोरोना काळाचा दाखला देताना, रेमडेशिवीरसाठी लोकांना कमी धावपळ करावी लागत होती. त्यासाठी नेत्यांनाही अधिकाऱ्यांना फोन करावे लागत होते. त्यावेळी जी परिस्थिती होती ती पाहता कोणी कोविड लस आणि रेमडेशिवीर कोणी बनवले हे पाहिलं नाही. किंवा त्यांची जात धर्म विचारला नाही. उलट देवा सारखा धावून आलात असेच बोलत होते. मात्र धर्म आड आला कि मग द्वेष करता असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी रेमडेशिवीर हे सिपला कंपनी बनवते पण त्याचा यूको हमीद आहेत. तर कोविड लस आदर पुनावाला यांनी निर्माण केली. या अल्पसंख्याकांनी देश वाचवला असे म्हणत त्यांनी हिंदू-मुस्लीम संघर्षावर जोरदार निशाना साधला आहे.