भावाच्या बोलण्यानं बहिणीला वेदना, अजित दादांचं ‘ते’ वक्तव्य ऐकून सुप्रिया सुळे म्हणाल्या…

| Updated on: Feb 17, 2024 | 5:48 PM

मुंबई, १७ फेब्रुवारी २०२४ : राजकारण हे कौटुंबिक स्थितीवर आणून ठेवलंय हे दुर्दैव आहे, माझं राजकारण कुटुंबाचं नाही तर जनसेवेचं आहे. सातत्याने तीन वेळा मला बारामती लोकसभा मतदारसंघाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला कामाची संधी दिली विश्वास दाखवला त्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे आभार मानले तर भाषणं करून संसदपटू होता येत नाही, अशी टीकाही अजित […]

मुंबई, १७ फेब्रुवारी २०२४ : राजकारण हे कौटुंबिक स्थितीवर आणून ठेवलंय हे दुर्दैव आहे, माझं राजकारण कुटुंबाचं नाही तर जनसेवेचं आहे. सातत्याने तीन वेळा मला बारामती लोकसभा मतदारसंघाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला कामाची संधी दिली विश्वास दाखवला त्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे आभार मानले तर भाषणं करून संसदपटू होता येत नाही, अशी टीकाही अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोकशाहीचं सर्वात मोठं मंदिर हे संसद आहे. दादाचं वक्तव्य ऐकून मला वेदना झाल्यात. ज्या लोकशाहीसाठी देशात महात्मा गांधींपासून लोकं लढलेत. त्यावर अविश्वास दाखवला गेला. हे अतिशय चिंताजनक आहे. यामुळे हा देश लोकशाहीकडून दडपशाहीकडे जावा का? असा सवालही मनात येतो, असं सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या टीकेवर बोलताना म्हटलं तर दादांकडे माझ्यासारखा तगडा उमेदवार असेल तर जरूर दयावा, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Published on: Feb 17, 2024 05:48 PM
रामदास कदम यांना भांडी घासण्याची हौस? खोचक सवाल करत सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
आता ‘मातोश्री’ उदास हवेली… डरकाळी नव्हे तर फक्त रडण्याचा…; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल काय?