शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा दावा; म्हणाले, ‘शिंदे गटातील एक्त 2 चं खासदार...’

शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा दावा; म्हणाले, ‘शिंदे गटातील एक्त 2 चं खासदार…’

| Updated on: Aug 06, 2023 | 1:37 PM

प्रत्येक पक्ष हा आपआपल्या पद्धतीने लोकसभेच्या तयारीला लागला आहे. तर त्याप्रमाणे भाजप देखील आता राज्यात उतरला आहे. गेल्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.

रत्नागिरी, 06 ऑगस्ट 2013 | आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुशंगाने राज्यात बिगूल वाजला आहे. प्रत्येक पक्ष हा आपआपल्या पद्धतीने लोकसभेच्या तयारीला लागला आहे. तर त्याप्रमाणे भाजप देखील आता राज्यात उतरला आहे. गेल्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्ली दौरे करत आहेत. यामागे आगामी लोकसभा निवडणूक असल्याचे बोलले जात असून जागा वाटपाच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राऊत यांनी महायुती बिघाडी होईल असे म्हणताना, शिंदे गटाच्या खासदारांचा पत्ता तिकीट वाटपावतून कट केलं जाईल असे म्हटलं आहे. यावरून राज्यात एकच चर्चा रंगली आहे. यावेळी राऊत यांनी, महायुतीमध्ये नक्कीच बिघाडी दिसणार असून त्याचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. तर गद्दार गटाच्या तेरा खासदारांपैकी फक्त दोघांनाच उमेदवारी दिली जाईल. तर बाकी ११ जणांचं विसर्जन केलं जाणार असल्याचं म्हटलं आहे. तर याबाबत दिल्लीमध्ये अधिकृत चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणालेत.

Published on: Aug 06, 2023 01:37 PM