अतिवृष्टीचा फटका; शेत गेलं, माती गेली, मातीबरोबर पीक पण गेलं; शेतकरी हैराण
नांदेडमध्ये देखील अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. येथे मागील काही दिवसापासून पाऊस सुरु आहे. दरम्यान जिल्ह्यात धुंवाधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठं नुकसान झालं आहे.
नांदेड, 29 जुलै 2023 | राज्यातील कोकण, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर आणि विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. तर विदर्भात पावसाने सध्या हाहाकार केला आहे. तर नांदेडमध्ये देखील अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. येथे मागील काही दिवसापासून पाऊस सुरु आहे. दरम्यान जिल्ह्यात धुंवाधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठं नुकसान झालं आहे. त्यातच मुदखेड तालुक्यात नद्यांना पूर आल्याने पुराचे पाणी शेतात घुसले. ज्यात पिके आणि शेतातील जमीन अक्षरशः खरडून गेली आहेत. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. तर मुदखेड तालुक्यातील जवळपास 20 ते 22 गावांना अतिवृष्टीचा फटका बसलेलं समोर येत आहे. झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, तूर, उडीद, मुगासह ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर पिकं तर गेलीच गेली पण त्याबरोबर जमीन देखील खरवडून गेल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे. Nanded Heavy Rains