हेमंत रासने यांच्या प्रचारात टिळक कुटुंब सहभागी होणार का? कुणाल टिळक यांनी स्पष्टच सांगितलं…
भाजपच्या नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीबाबत टिळक कुटुंबाची काय भूमिका आहे? पाहा...
पुणे : भाजपच्या नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी न दिल्याने टिळक कुटुंब नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यावर मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात आम्ही आजपासून सहभागी होणार आहोत. नाराजीचा विषय आता मागे पडला आहे. पक्षात भविष्य आहे म्हणून कामाला लागलो, असं नाही. तर कार्यकर्ता म्हणून मी काम करतच असतो. कसब्यात भाजपचा विजय निश्चित आहे. दिवस कमी आहेत. त्यामुळे घरोघरी जाऊन प्रचार करावा लागेल. आम्ही चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं की दुखाःतून सावरायला वेळ लागेल. मात्र आजपासून आम्ही प्रचारात सहभागी होतोय”, असं कुणाल टिळक म्हणाले आहेत.