कितीही यात्रा काढा, पण चोरांना कधी आशिर्वाद मिळत नाही; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
Aditya Thackeray on Cm Eknath Shinde : शेवटी गद्दार ते गद्दारच, लोक त्यांना जवळ करणार नाहीत, असं म्हणत आमदार आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलंय. पाहा ते काय म्हणालेत...
मुंबई : वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीतील अनेक मंडळांना भेटी दिल्या. तसंच घरोघरी जाऊन त्यांनी लोकांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली. तसंच भाजप आणि शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेवरही त्यांनी निशाणा साधला. मी आज वरळीत आलो आहे. भेटीगाठी घेत आहे. लोकांचा पाठिंबा मिळत आहे, असं आदित्य म्हणाले. विरोधकांच्या आशिर्वाद यात्रेवर जास्त काही बोलणार नाही. एवढंच सांगतो की लोकांच्या मनात चीड आहे. त्यामुळे चोरांना कधी आशीर्वाद मिळत नाही. शेवटी चोर चोर असतात आणि गद्दार गद्दार असतात, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
Published on: Mar 06, 2023 09:55 AM
Latest Videos