मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन सुस्साट ! अर्थसंकल्पात इतक्या भरीव निधीची तरतूद
देशाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी १९ हजार कोटी इतक्या भरीव निधीची तरतूद केली आहे. ७ बुलेट ट्रेन प्रकल्पाना गती देण्यासाठी अर्थसंकल्पात ही तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यातील काही प्रमुख मुद्दे आता समोर येऊ लागले आहेत. त्यातील मुंबईसाठी महत्वाचा असलेला मुद्दा म्हणजे बुलेट ट्रेन. देशाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी १९ हजार कोटी इतक्या भरीव निधीची तरतूद केली आहे. ७ बुलेट ट्रेन प्रकल्पाना गती देण्यासाठी अर्थसंकल्पात ही तरतूद करण्यात आली आहे. हा निधी वाढविल्यामुळे मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनला आणखी गती मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाने 2023-24 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी 13,539 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 2009-14 च्या सरासरी 1171 कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम जवळपास 11 पट अधिक आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप

कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
