“आरएसएसवर बंदी घालण्याची ताकद जगात कोणातही नाही, यापुढेही नसेल”
भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी आरएसएससंदर्भात एक विधान केलंय.
गोविंद ठाकूर,TV9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : भाजप खासदार गोपाळ शेट्टी (MP Gopal Shetty) यांनी आरएसएससंदर्भात एक विधान केलंय. आरएसएसवर (RSS) बंदी घालण्याची ताकद या जगात कोणाचीही नाही. यापूर्वीही ती नव्हती आणि यानंतरही तशी हिंमत कुणाच्यात येणार नाही, असं गोपाळ शेट्टी म्हणालेत. विरोधी पक्षाने हल्ला करायचाच असेल तर तो कोणावर करायचा? देश असो की अख्ख्या जगातील सर्वात मोठी संघटना आरएसएस ही नवी पद्धत सुरू झाली आहे. 2024 पर्यंत अशा प्रकारचे आरोप अधिकाधिक केले जावेत, जेणेकरून आपला केडर अधिक जागरूक होईल, असंही शेट्टी म्हणालेत.
Published on: Sep 29, 2022 12:24 PM
Latest Videos