कायंदे यांचा ठाकरे गटाला राम राम! अशिष शेलार म्हणाले, ‘अभिनंदन, बाळासाहेबांच्या विचारांच्या...’

कायंदे यांचा ठाकरे गटाला राम राम! अशिष शेलार म्हणाले, ‘अभिनंदन, बाळासाहेबांच्या विचारांच्या…’

| Updated on: Jun 18, 2023 | 1:57 PM

गेल्या वर्ष भरात अनेक नेत्यांनी ठाकरे गटाला राम राम केल्यानंतर आता विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे यांनी देखील ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' केला आहे. दरम्यान शिवसेना वर्धापन दिनाच्या पुर्वसंधेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील असे बोलले जात आहे.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्क्यामागून धक्के बसत आहेत. गेल्या वर्ष भरात अनेक नेत्यांनी ठाकरे गटाला राम राम केल्यानंतर आता विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे यांनी देखील ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. दरम्यान शिवसेना वर्धापन दिनाच्या पुर्वसंधेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील असे बोलले जात आहे. तर मनिषा कायंदे यांच्यासोबत 2 माजी नगरसेवकदेखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. तर यावरून मुंबई भाजपचे अध्यक्ष अशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, जे कोणी शिंदे साहेबांच्या पक्षात जात असतील ते बाळासाहेबांच्या विचारांच्या, मुंबईकरांच्या बाजूने भूमिका घेत आहेत. त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करीन. त्यांनी घेतलेल्या भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादस पात्र आहेत. तर जे औरंगजेबी वृत्ती बरोबर आहेत त्यांना महाराष्ट्र धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.

Published on: Jun 18, 2023 01:57 PM