Video : CSMT च्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर हार्बर रेल्वेचा डबा रुळावरून घसरला

Video : CSMT च्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर हार्बर रेल्वेचा डबा रुळावरून घसरला

| Updated on: Jul 26, 2022 | 11:33 AM

CSMT : हार्बर रेल्वेचा डबा रुळावरून घसरला

छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर हार्बर रेल्वेचा डबा रुळावरुन घसरला आहे. त्यामुळे वाहतूक ही विस्कळीत झाली होती. घटनेनंतर लागलीच रेल्वे प्रशासनाने या रेल्वेरुळावरील वाहतूक बंद ठेवली आहे. ऐन सकाळच्या प्रहरीच ही घटना घडल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. पनवेलकडे मार्गस्थ होणाऱ्या लोकलबाबत हा प्रकार घडला आहे. त्यामुळे काही या मार्गावरील रेल्वे वाहतूक ही काळापर्यंत का होईना ठप्प राहणार आहे. एक ते दोन तासांत हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर येईल, असं सांगितलं जातंय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लोकलचा डबा प्लॅटफॉर्मला धडकल्यानंतर लगेचच रेल्वे प्रशासनाकडून या घटनेची दखल घेण्यात आली आहे.

Published on: Jul 26, 2022 11:33 AM