राहुल गांधी कधीही सावरकर होऊ शकत नाहीत, सावरकर होण्यासाठी कुणातही औकात नाही- देवेंद्र फडणवीस

राहुल गांधी कधीही सावरकर होऊ शकत नाहीत, सावरकर होण्यासाठी कुणातही औकात नाही- देवेंद्र फडणवीस

| Updated on: Apr 04, 2023 | 10:35 AM

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागलंय. सावरकर होण्याची काँग्रेसमध्ये कुणातही औकात नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत. पाहा...

मुंबई : सावरकर गौरव यात्रेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली आहे. राहुल गांधी कधीही सावरकर होऊ शकत नाहीत. सावरकर होण्यासाठी कुणातही औकात नाही. काँग्रेसमध्ये तर कुणाच्यातच सावरकर होण्याची औकात नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तुम्ही कितीही सावरकरांचा विरोध कराल तरी देखील एक एक नागरिक रस्त्यावर येऊन म्हणेल, होय मीच सावरकर आहे आणि मीच सावरकर आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तिन्ही सरकारच्या पैशावर जिवंत राहतात, असे लोक सावरकरांसारख्या देशभक्ताला शिव्या शाप देतात. त्यांना माफीवीर म्हणतात, हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही, असंही फडणवीस म्हणाले.

Published on: Apr 04, 2023 10:23 AM