सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय ब्रिज प्रवाशांसाठी खुला; पाहा व्हीडिओ...

सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय ब्रिज प्रवाशांसाठी खुला; पाहा व्हीडिओ…

| Updated on: Mar 30, 2023 | 12:27 PM

Mumbai Himalaya Bridge : मुंबईतील हिमालय पूल प्रवाशांसाठी खुला होणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. पाहा व्हीडिओ...

मुंबई : मुंबईतील हिमालय पूल प्रवाशांसाठी खुला होणार आहे. या हिमालय पुलाचं काम पूर्ण झालं आहे. आता हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक आणि टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारतीजवळील रस्त्याला जोडणारा हिमालय पूल आजपासून सुरू होणार आहे. 4 वर्षांपूर्वी हा पूल अचानक कोसळला होता. तेव्हापासून या पुलाचे पूनर्बांधणीचं काम सुरू होतं. आता अखेर हे काम पूर्ण झालंय. आजपासून हा पूल नागरिकांच्या सेवेत येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील हा पहिलाच पोलादापासून तयार करण्यात आलेला पूल आहे.

Published on: Mar 30, 2023 12:26 PM