Breaking | केंद्राप्रमाणे आम्हालाही जोखीम भत्ता द्या, मुंबईत जेजे रुग्णालयात नर्सचं आंदोलन
केंद्राप्रमाणे आम्हालाही जोखीम भत्ता द्या, या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयातील नर्सने कामबंद आंदोलन केले. (Mumbai J J Hospital Nurse agitation for verious demand)
राज्यातील सरकारी रुग्णालयातील नर्सकडून 21 जूनपासून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. केंद्राप्रमाणे आम्हालाही जोखीम भत्ता द्या, या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयातील नर्सने कामबंद आंदोलन केले. यात जे.जे. रुग्णालयातील ३७५, सेंट जॉर्ज रुग्णालयातील १७५ आणि जीटी रुग्णालयातील १०० परिचारिका सहभागी झाल्या होत्या. त्याचसोबत राज्यभरातील सर्व शासकीय रुग्णालयांतील परिचारिकांनी सहभाग नोंदवला. या आंदोलनानंतर मागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. (Mumbai J J Hospital Nurse agitation for verious demand)
Latest Videos