उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीचे संबंध काय? ठाकरेंची कंपनी चतुर्वेदीची कशी झाली? किरीट सोमय्यांचा सवाल
उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीचे (Nandkishor Chaturvedi) संबंध काय आहेत, हे मुख्यमंत्र्यांनी आताच सांगावं. म्हणजे कोर्ट आणि तपासयंत्रणांचे काम वाचेल, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
मुंबईः उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीचे (Nandkishor Chaturvedi) संबंध काय आहेत, हे मुख्यमंत्र्यांनी आताच सांगावं. म्हणजे कोर्ट आणि तपासयंत्रणांचे काम वाचेल, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी स्थापन केलेली कंपनी आज हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीची आहे, हा व्यवहार का झाला, कसा झाला, असे प्रश्न किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी उभे केले आहेत. काल मंगळवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाणे येथील मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. त्यामुळे श्रीधर पाटणकर आणि रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत ठाकरे बोलणार का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. महाविकास आघाडीतील मंत्र्यांविरोधात भाजपने ईडी कारवाईचे सत्र चालवले आहे, असा आरोप वारंवार केला जात आहे. आता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावरच ईडीची धाड पडल्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.