आज मेगा ब्लॉक, कोणत्या मार्गावरील वाहतूक बंद राहील? पाहा…
मुंबईत सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. कोणत्या मार्गांवर मेगा ब्लॉक आहे? पाहा...
मुंबईत सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. आज सीएसएमटी – कल्याण, खोपोली, कसारा या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक नसेल. मात्र पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट – मुंबई सेन्ट्रलदरम्यान दोन्ही जलद मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे – वाशी, नेरूळ अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लाॅककाळात ठाणे ते वाशी, नेरुळ, पनवेलदरम्यानच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
हाबर्रवरही सीएसएमटी – चुनाभट्टी, वांद्रेदरम्यान डाऊन मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी, वांद्रे – सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक आहे.
ठाणे-वाशी, नेरूळ या ट्रान्स हार्बरवरील दोन्ही मार्गांवर आणि सीएसएमटी – चुनाभट्टी, वांद्रेदरम्यान दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे.
त्यामुळे सीएसएमटी, वडाळा ते वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगावदरम्यानच्या दोन्ही मार्गांवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.