प्रवाशांचे हाल, मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक
मुंबईकरांनो विकेंडचा प्लान करत आहात? लोकलने प्रवास करायचा आहे? तर थांबा... आधी लोकलचं वेळापत्रक पाहा आणि मगच घराबाहेर पडा.
मुंबई, 30 जुलै, 2023 | मुंबईकरांनो विकेंडचा प्लान करत आहात? लोकलने प्रवास करायचा आहे? तर थांबा… आधी लोकलचं वेळापत्रक पाहा आणि मगच घराबाहेर पडा. कारण आभियांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर ठाणे आणि कल्याण दरम्यान सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तर मुंबईतील हार्बर मार्गावर पनवेल-वाशी दरम्यान आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम मार्गावरील मरिन लाइन्स ते माहिम डाऊन या धिम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
Published on: Jul 30, 2023 09:35 AM
Latest Videos