मुंबईकरांनो, लोकलचं वेळापत्रक पाहा अन् मगच घराबाहेर पडा; 'या' मार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबईकरांनो, लोकलचं वेळापत्रक पाहा अन् मगच घराबाहेर पडा; ‘या’ मार्गांवर आज मेगाब्लॉक

| Updated on: Mar 05, 2023 | 9:57 AM

Mumbai Local Train Megablock News : आज रविवार आहे. त्यामुळे मुंबई लोकलचा मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य-हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक असेल. पाहा...

मुंबई : ठाणे ते कल्याण पाचवा-सहावा मार्ग आणि कुर्ला ते वाशी या मार्गावर मध्य रेल्वेने आज मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत हार्बर लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही ट्रेन विलंबाने धावणार आहेत. प्रगती एक्स्प्रेससह अन्य मेल-एक्स्प्रेस विलंबाने धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदरदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असल्याने पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक असणार नाही. मध्य रेल्वेवर ठाणे – कल्याण दरम्यान सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत मेगा ब्लॉक असेल. हार्बर रेल्वेवर कुर्ला – वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी ब्लॉक नाहीये. बोरिवली ते भाईंदर अप आणि डाऊन जलद शनिवार रात्री 11.45 ते आज (रविवार) पहाटे 4.45 पर्यंत मेगाब्लॉक होता.

Published on: Mar 05, 2023 09:50 AM