CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचा सिद्धविनायकाच्या दर्शनाने कामाचा श्रीगणेशा !

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचा सिद्धविनायकाच्या दर्शनाने कामाचा श्रीगणेशा !

| Updated on: Jul 05, 2022 | 5:01 PM

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांचे अनेक सहकारी हजर होते.

मुंबईः मुख्यमंत्री पदाच्या कामकाजाची सुरुवात करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सकाळीच सिद्धिविनायकाचं (Siddhivinayak Temple)दर्शन घेतलं. सिद्धिविनायक मंदिरात मुंबईच नव्हे तर देशभरातून भाविक हजेरी लावतात. काल बहुमत चाचणीत (Majority test) बाहुबली ठरलेल्या शिंदे आज कामाचा श्रीगणेशा करण्यापूर्वी सिद्धिविनायकासमोर नतमस्तक झाले. यावेळी त्यांना गणपतीचं मानाचं नारळ देण्यात आलं.
सिद्धिविनायक मंदिरात आज सदा सरवणकर, दीपक केसरकर यांच्यासह शिंदे गटातील महत्त्वाचे आमदार घेऊन एकनाथ शिदे दर्शनासाठी पोहोचले. यावेळी मंदिरातील गुरुजींनी नव्या मुख्यमंत्र्यांना गणपतीचं मानाचं नारळ आणि शाल देऊन स्वागत केलं.त्यानंतर शिंदे यांचा ताफा मंत्रालयाच्या दिशेने निघाला. मुंबईचा सिद्धिविनायक हा नवासाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे, आता मुख्यमंत्र्यांचा कोणत्या नवसाला सिद्धिविनायक पावला असेल हे वेगळं सांगायला नको.