मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर छातीत दुखत असल्यानं रुग्णालयात दाखल

| Updated on: Jul 18, 2021 | 5:41 PM

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महापौरांच्या कार्यालयातून तशी माहिती देण्यात आली आहे.  किशोरी पेडणेकर यांना काल रात्रीपासूनच त्रास होत होता. छातीत दुखू लागल्याची तक्रार त्यांनी केली होती. मात्र, हा त्रास अधिक वाढल्याने आज सकाळी त्यांना ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना रुग्णालयात दाखल करताच तातडीने विविध चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांचं एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. मात्र, त्यांना नेमका काय त्रास होत आहे आणि त्यांना कधीपर्यंत डिस्चार्ज होईल याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.

Kalyan | कल्याणमध्ये लोकोपायलटच्या प्रसंगावधानामुळे वृद्ध बचावला
इंधनाच्या किमती वाढण्याचं कारण मोदी सरकार करत असलेली करवाढ,पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप