मेट्रोच्या जमिनीचा वाद शिगेला; भाजप-शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने
आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणमंत्री असताना आरे कारशेडला विरोध करत, आरेचं जंगलं वाचलं पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. पण आघाडीचं सरकार गेलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होताच पुन्हा एकदा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील प्रोजेक्त सुरू करण्याची घोषणा केली
मुंबई : मुंबई मेट्रो कारशेडवरुन शिवसेना ठाकरे गट आणि भाजप आमने सामने आली आहे. मेट्रो कारशेडवरुन शिवसेनेचे तरुण नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका आणि आरोप करताना दिसत आहेत. आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणमंत्री असताना आरे कारशेडला विरोध करत, आरेचं जंगलं वाचलं पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. पण आघाडीचं सरकार गेलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होताच पुन्हा एकदा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील प्रोजेक्त सुरू करण्याची घोषणा केली. हा वाद मिटतो न मिटतो तोच नवा वाद सुरू झाला आहे. मेट्रो लाईन 6 साठी कांजूरमार्ग जागा देण्यात आली आहे. त्यावरून आता राजकारण तापलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट
Published on: Apr 16, 2023 07:34 AM
Latest Videos